छत्तीसगडमध्ये पोलिस चकमकीत 7 नक्षलवादी ठार

0

रायपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात आज, शुक्रवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान ही चकमक अजूनही सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नारायणपूर आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचनाक पोलिस पथकावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला सतर्क असलेल्या पोलिस दलाने तत्काळ प्रत्युत्तर दिले. यात काही नक्षलवादी ठार झाले असून पोलिसांना आतापर्यंत 7 मृतदेह गवसले आहेत. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यानंतर ते क्षेत्र सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे देखील एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech