चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीवर अतिरिक्त वर्ग घेण्याच्या बहाण्याने संचालकांने लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान शुक्रवारी आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. चंद्रपूरमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक केली. आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या आईचे कौतुक केले आहे. पीडित मुलीच्या आईच्या हिंमतीमुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरीब घरातल्या एका मुली सोबत झालेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये काय काय चालतय हे आम्हाला पाहायला मिळाले. या प्रकरणात पीडित मुलगी एकटी नसून आणखीही मुलींचं शोषण झाल्याची शक्यता आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल याची आम्हाला खात्री असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उन्हाळ्यात अतिरिक्त घेण्याच्या बहाण्याने आरोपी संचालकांने पीडित मुलीवर अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित मुलीला धमकावले. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली. आरोपी हा युवक काँग्रेसचा कोरपना शहराध्यक्ष आहे. तर संबंधित शाळेच्या दुसऱ्या संचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.