बदलापूर लैंगिक अत्याचार : एन्काऊंटर करून प्रकरण दडपल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप

0

मुंबई – बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे प्रकरण दडपले जात असल्याचे गंभीर आरोप पीडित मुलीच्या आईने केले आहेत. तिच्या मते, तपासाऐवजी शिंदेचा एन्काऊंटर केल्याने आणखी आरोपींची ओळख पटवण्याची संधी गमावली गेली आहे. शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांचाही यात सहभाग असल्याचा संशय असून, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी प्रकरण दडपले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधक आणि जनतेतून इतर सहआरोपींच्या अटकेची मागणी झाली. परिणामी, घटनेनंतर काही कालावधीनंतर एसआयटीने तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक केली. मात्र, पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, चौकशीत काय निष्पन्न झाले, याबाबत कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही, आणि जामिनावर आरोपींची सुटका झाल्याची बातमीसुद्धा लपवण्यात आली. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत तत्काळ कारवाई करण्यास भाग पाडले. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech