सोलापूर – मंगळवेढा तालुक्यातील 1100 कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात सध्या गाजत असलेल्या मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याने मतदार संघात सर्वाधिक असलेल्या मराठा व धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाची जिल्ह्यात सर्वाधिक वनवा हा मंगळवेढा तालुक्यात पेटला. येथील मराठा बांधवांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वेगळ्या माध्यमातून पाठिंबा देण्याचे काम केले असतानाच मराठा आरक्षणावर निश्चित तोडगा न निघाल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 45 हजार 523 मतांनी भाजपचा उमेदवार मागे राहिला. तर, मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील भिजत ठेवल्यामुळे तो ही समाज या मतदारसंघात निर्णयाक भूमिकेमध्ये आहेत.
अशा परिस्थितीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यामध्ये त्यांच्याकडून या समाज बांधवांना दिलासादायक भाषण अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाचीच अधिक माहिती सांगत मतदारसंघात प्रभाव टाकणाऱ्या आरक्षण प्रश्नावर कोणते सुतोवाच केले नाहीत त्यामुळे या समाजबांधवात नाराज आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मराठा धनगर आरक्षणाचा व विषय या पुढील काळात देखील कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.