विलक्षण व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-पंतप्रधान

0

नवी दिल्ली –  जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील दूरदर्शी व मानवी संवेदना जपणारे विलक्षण व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. आपल्या शोक संदेशात पंतप्रधान म्हणाले की, रतन टाटांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वार मोठी शोककळा पसरली आहे. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांच्या उद्योगविश्वातील तत्त्वे ही तरुण उद्योजकांसाठी आदर्श आहेत आणि ती कायम राहतील अशा भावना युवा उद्योजक व्यक्त करत आहेत. रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केले होते. टाटांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाल्याचे मोदी यांनी म्हंटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech