बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांतील सराइतांची चौकशी

0

पुणे – बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.बोपदेव घाट परिसरात गुरुवारी रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटातील माेबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech