बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (पवार) गटाला पाठिंबा

0

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत ही लढत होणार असून घटकपक्षांमुळे मतभेद निर्माण झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे वंचितनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु, स्वतंत्र लढत असले तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात एक्सवरून माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने गेल्यावर्षी ठाकरे गटाबरोबर युती जाहीर केली. त्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, इतर घटकपक्षातील मतभेदामुळे महाविकास आघाडीतील त्यांचा मार्ग खडतर होता. परंतु, हे मतभेद दूर सारून त्यांनी महाविकास आघाडीत घेण्यात आले होते. परंतु, कालांतराने ठाकरे गटाबरोबर त्यांचं फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून माघार घेतली. परिणामी आता महाराष्ट्रात तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाविरोधात उभे राहिलेले प्रकाश आंबेडकरांनी मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech