नारायण राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावर दावा

0

रत्नागिरी – आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु, जागा वाटपाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये असलेल्या घटकपक्षांमुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीय. आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही महायुतीमध्ये मतभेद आहेत. या जागेवरून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनेही दावा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यात या जागेवरून जुंपली आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी या जागेवर दावा केला आहे. “सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचाच आहे. या जागेसाठी मी कोणाशी बोलायला गेलो नाही. मला तिकिट द्या, असं मी माझ्या नेत्याला बोललेलो नाही. भाजपाचे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पालिकेत भाजपाची सत्ता आहे. ही सर्व ताकद असताना आम्ही हा मतदारसंघ सोडणार का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech