मुंबई – आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी समारंभ होणार असून यामधे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ समारंभ होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेणार असून विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. यामधे शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सन्माननीय सदस्य श्रीमती चित्रा किशोर वाघ, श्रीकांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ श्रीमती मनीषा कायंदे अश्या सात सदस्याचा शपथ समारंभ होणार आहे.