राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल

0

नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, मंगळवारी झारखंड आणि महाराष्ट्रासह 15 राज्यांमधील विधानसभेच्या 48 जगांवरील पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर केलाय. यासोबतच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड या लोकसभेच्या जागांसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. पैकी सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथीली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. परंतु, अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. दरम्यान, ज्या 15 राज्यांमधील विधानसभेच्या 48 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये आसाममधील 5, बिहारमधील 5, चंडीगडमधील 1, गुजरातमधील 1, केरळमधील 2, मध्य प्रदेशमधील 2, मेघालयातील 1, पंजाबमधील 4, राजस्थाच्या 7, सिक्कीममधील 2, उत्तर प्रदेशमधील 9, उत्तराखंडमधील 1 आणि पश्चिम बंगालमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यासोबतच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यात वायनाडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी आणि नांदेडमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.

असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक –
निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नव मतदार – 20.93 लाख
पुरूष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
युवा मतदार – 1.85 कोटी
तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6.32 लाख

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech