ठाणे – टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माता-भगिनींसाठी ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी आदी क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. एका टप्प्यात होणार्या या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. मला विश्वास आहे की महायुती पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल. महायुती शासनाने, टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माताभगिनिंना ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी असेल. अश्या अनेक क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल. ह्या विधानसभेचा कार्यकाल हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्याच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे आणि त्यामुळेच कार्यकाल संपायच्या आत विधानसभेची निवडणूक व निवडणूक निकाल दोन्ही पार पडत आहे. त्यामुळे कुठेही केंद्रीय निवडणूक आयोग २६ नोव्हेंबर नंतर निवडणूका घेत नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. कुठल्या मुद्द्यांवर महायुतीविरोधात प्रचार करायचा हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडलेला आहे. तरुण मतदारांना खासकरुन १८ ते २५ वयोगटातील मतदारांना व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन आहे की, परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा जो पवित्र हक्क आपल्याला दिलेला आहे तो हक्क आपण निभावला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रात मतदान कसे होईल यासाठी माझ्या तरुण मित्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे अपील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.