माझा आणि उद्धव ठाकरेंचा लढा महाराष्ट्रवर अन्याय करणा-याविरोधात….!

0

शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांचा महायुती विरोधात एल्गार

मुंबई : अनंत नलावडे
भाजप आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई जिंकता येत नाही म्हणून मुंबई अदानीच्या घशात घातली जात आहे.अदानी साठीच मुंबईतील महत्त्वाच्या जागांचा लिलाव केला जातोय. कारण पालिकेकडे पैसै नाहीत म्हणून लिलावातून पैसै उभे करणार आहेत.यातून पालिकेच्या मालकीच्या मंडई सुध्दा सुटलेल्या नाहीत.आता ते कोळीवाड्यात ही जातील.त्यामूळेच माझा आणि उध्दव ठाकरे यांचा लढा महाराष्ट्र लुटणाऱ्यां विरोधात आहे. आणि लुटारू माझे सगळे प्रतिस्पर्धी आहेत,अशा परखड शब्दात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी महायुती च्या विरोधात एल्गार पुकारला.

गुरूवारी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांनी भाजप व महायुती सरकारवर विविध गंभीर आरोपांच्या फैरी झाडत यावेळी खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नोट बंदीचा निर्णय फसला आहे.आणि पीएम केअर सारखं नियोजन आम्ही केलेलं नाही,अशा मार्मिक शब्दात त्यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांनाही चिमटा काढत,त्यांनी महायुती सरकारचा मुंबई लुटीचा छुपा डावही समोर आणला.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची आर्थिक घडी बसवलेली होती.मुंबईकरांवर टॅक्सही लावला न्हवता,पण या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबई अक्षरशः लुटली, तसेच कंत्राटदाराला पैसे दिले आणि रस्ता झालाय,असं एक तरी काम दाखवा, कारण याचं पैशांतून त्यांनी खिसे भरले. क्रॅाफेड मार्केट जवळची मंडई, मलबार हील येथील पॅावर स्टेशन आणि वरळीतील अस्लाल्ट प्लांट यांचाही आता लिलाव केला जाणार आहे, अशा आरोपांच्या फैरी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर झाडत,जिथे लोकप्रतिनिधी नाहीत अशा ठिकाणी प्रशासकांना लिलाव करण्याचा अधिकार दिला कोणी ? असा संतप्त सवालही ठाकरेंनी केला.

……. तरं ते सगळ आम्ही रद्द करु
आम्ही पालिकेत असताना ९२ हजार कोटींच्या ठेवी वाढवल्या.परंतु आता पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे.त्यामुळे पालिकेच्या जागांचा यांनी लिलाव सुरू केलाय.आता भाजपवाले व घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. कारण पालिका विकण्याचे काम सध्या सुरू असल्याने आचारसंहितेत कुणाला काय परवानगी आहे ते निवडणूक आयोगाने सांगावे.आदर्श आचार संहिता डावलून महायुतीचे अनेक ठिकाणी पोस्टर लागले आहेत.रेल्वेतही जाहीराती सुरू आहेत,याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech