श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जिहादींनी पुन्हा एकदा परप्रांतीय हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या केलीय. अशो चव्हाण असे मृतकाचे नाव असून राज्य सरकारचा शपथविधी आटोपल्यानंतर लगेच परप्रांतीय हिंदूंना राज्यात लक्ष्य बनवणे सुरू झाले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात हिंदू आणि बिगर काश्मिरी लोकांची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चौहान असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. ओमर अब्दुला यांनी बुधवारी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. डल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याबरोबर अवघ्या काही तासात शोपियानमध्ये टार्गेट किलींग करण्यात आले.