झारखंडच्या पोलिस महासंचालकांना पदावरून हटवले

0

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांवर कारवाई
रांची – केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडचे पोलीस महासंचालक अनुराग गुप्‍ता यांना पदावरुन तत्‍काळ हटवण्‍याचे निर्देश दिले आहेत. अनुराग गुप्ता यांच्याऐवजी सर्वात वरिष्ठ डीजीपी स्तरावरील अधिकाऱ्याला महासंचालक म्हणून जबाबदारी द्यावीअसे म्हंटले आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे की, झारखंडप पोलीस महासंचालक अनुराग गुप्‍ता यांना पदावरुन तत्‍काळ हटविण्‍यात यावे. त्‍यांच्‍या जागी कॅडरमध्ये सर्वात वरिष्ठ अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षकांकडे पदभार सोपविण्‍यात यावा. राज्य सरकारला या सूचनांचे शिस्‍तपालन अहवाल शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. गुप्ता यांच्या विरोधात आयोगाने मागील निवडणुकांदरम्यान केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्‍यात आली आहे. महासंचालक गुप्ता यांच्याविरोधातील तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्‍यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंड विधानसभेच्या निवडणुका 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू झाली आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान झारखंड मुक्ती मोर्चासाठी पक्षपाती वर्तन केल्याच्या आरोपानंतर 2019 मध्ये गुप्ता यांना एडीजी (विशेष शाखा) झारखंड म्हणून त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले होते. त्या वेळी, त्यांना दिल्लीतील निवासी आयुक्त कार्यालयात पुन्हा नियुक्त करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झारखंडला परत जाण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच, 2016 मध्ये झारखंडमधील राज्य परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांदरम्यान, तत्कालीन अतिरिक्त डीजीपीगुप्ता यांच्यावर अधिकाराचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांचा सामना करावा लागला होता. यासाठी निवडणूक आयोगाने एक चौकशी समिती स्थापन केली होती, ज्याच्या निष्कर्षांच्या आधारे, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र जारी करण्यात आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech