नवी दिल्ली – राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे आयोजित समारंभात पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने (DoWR, RD &GR) अलिकडेच 14 ऑक्टोबर 2024 रोजी पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 साठी संयुक्त विजेत्यांसह एकूण 38 विजेत्यांची घोषणा केली आहे.
यात सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा अथवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग क्षेत्र, सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ती संघटना, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा अथवा महाविद्यालय वगळून) आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था अशा एकूण 9 वर्गवारी अंतर्गतच्या विजेत्यांचा समावेश आहे.