गडचिरोलीत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान

0

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी आज, सोमवारी छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी आणि कोठी गावांच्या जंगलात मोठी कारवाई केली आहे. या चकमकीत 5 ते 8 नक्षली ठार झाले आहेत. आतापर्यंत 5 नक्षलवादी ठार झाल्याची अधिकृत माहिती पुढे आलीय. परंतु, शोध मोहिम पूर्ण झाल्यानंतर याबाबत सविस्तर आकडा कळू शकेल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती .त्यानुसार नक्षलवादी अभियान पथकाने शोध मोहीम राबवून कारवाई केली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी मोठया सुरक्षा जवानांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला अतुतरात सुरक्षा जवानांना नाही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटायची आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा इरादा असतो सुरक्षा जवानांनी हाणून पाडला आहे. या चकमकीत एक पोलिस शिपाई जखमी झाल्याचे वृत्त आहे. विशेष ,म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकी च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech