आमदार संजय केळकर यांचे, ठाण्यात घरोघरी जोरदार स्वागत
ठाणे – भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाइं महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन घर चलो अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले, 148 विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, स्थानिक माजी नगरसेवक सूनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, बूथ प्रमुख, पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर चलो अभियान अंतर्गत ठाणे शहर मतदारसंघात घरोघरी पत्रके वाटून उमेदवार संजय केळकर यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करून सोबत राहण्याचा विश्वास दिला. गेल्या दहा वर्षांत कार्यालयाचे दरवाजे सताड उघडे ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असल्याबद्दल नागरिकांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. नागरी विकासकामे, एसआरए प्रकल्प, रखडलेल्या जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, आणि अन्य सोयी-सुविधा मार्गी लावून संजय केळकर यांनी नागरिकांना दिलासा दिल्याच्या प्रतिक्रिया विविध भागांतील नागरिकांनी दिल्या. तर पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.
सकाळी ९ वाजता हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी मंदिरात अभियानाला सुरुवात करून पत्रके वाटण्यात आली. त्यानंतर खारटन रोड येथे रमाबाई चौक येथे श्री.केळकर यांनी अभिवादन केले. वाल्मिकी मंदिर येथे दर्शन घेऊन महागिरी कोळीवाडा, खारटन रोड परिसरात पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नम्रता कोळी, सुनील हंडोरे, जयेंद्र कोळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील चौक, राबोडी येथे पत्रक वाटप करताना माजी नगरसेवक मिलिन्द पाटणकर, मंडल अध्यक्ष दिलीप कंकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गोकुळ नगर, गोकुळदास वाडी येथे माजी नगरसेवक कृष्णा पाटील, नंदा पाटील, दीपा गावंड तसेच पदाधिकारी सचिन पाटील, दिलीप कंकाळे, विजय रेडेकर आदी उपस्थित होते. रायगड गल्ली, चंदनवाडी परिसरात माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, महेश कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बाळकूम नाका येथे संजय केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील शेकडो रहिवासी आणि नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. यावेळी बाळकूम गाव आणि शिवाजी नगर परिसरात पत्रक वाटताना पदाधिकारी हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोरमा नगर, आझाद नगर परिसरात पत्रक वाटप करताना हेमंत म्हात्रे, महेश ताजणे, चंद्रमा चौहान आदी पदाधिकारी उपस्थित होते. कमिशनर बंगला आणि डोंगरी पाडा भागात माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, कमल चौधरी, कविता पाटील, अर्चना मणेरा तसेच पदाधिकारी सुनील नरे आदी उपस्थित होते. धर्मवीर नगरमध्ये माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे, आशादेवी सिंग तसेच पदाधिकारी संतोष जयस्वाल, विश्वनाथ घाणेकर आदी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या घर चलो अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना केळकर यांनी नागरिकांचे आभार मानले. दररोज मी नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून हजारो नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे केळकर म्हणाले.