अमरावती – अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्रीगुरुदेव ग्रामगीताजीवन विकास परीक्षा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या सन २०२४-२०२५ या वर्षात घेतलेल्याग्रामगीताचार्य या परीक्षेत पदवी प्राप्त करणाऱ्या एकूण ४१ महिला व पुरुषांना राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवात ग्रामगीताचार्य ही पदवी देऊन त्यांना प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
या पदवीधारकांना ग्रामगीताचार्याची पदवी, सुवर्णपदक व स्मृतिचिन्हदेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्रीगुरुदेवसेवामंडळाचे संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पा बोंडे ह्या होत्या तर उद्घाटक सेवामंडळाचेसर्वाधिकारी लक्ष्मण गमे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विजयादेवी (भीलवाडा), स्वाध्वी भगवतदासत्यागी, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे, महादेव राघोर्ते, बाबारावपाटील, अॅड. दिलीप कोहळे, दिलीप गावंडे, पी.पी. पाळेकर, सुर्यप्रकाश जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.