नवी दिल्ली – शाश्वत वाहतूक उपायांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासमोर इंडियन ऑइलद्वारे संचालित हायड्रोजन-इंधनयुक्त बसचे प्रात्यक्षिक दाखवून हरित हायड्रोजन गतिशीलतेत भारताच्या प्रगतीचे प्रदर्शन केले.
हरित ऊर्जा उपक्रमांना चालना देण्यासाठी भारत आणि भूतान यांच्यातील सामायिक दृष्टीकोन या भेटीने अधोरेखित केला. पर्यावरणीय शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जा उपायांसाठी देशाच्या बांधिलकीशी सुसंगत अशा हरित हायड्रोजन गतिशीलतेचा अवलंब करण्यात भूतानच्या प्रतिनिधी मंडळाने स्वारस्य दाखवले.