मुंबई – शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे परतीसाठी फोन आल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. आम्हाला पुन्हा पदरात घ्या, म्हणत शिंदे गटातील अनेकांचे फोन आले, असा दावा संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात केला आहे. गद्दारांना आता पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शिंदे गटात गेलेल्यांचे आम्हाला पुन्हा पदरात घ्या, यासाठी फोन आले आहेत. आमची चूक झाली, आम्हाला पुन्हा घ्या, आम्हाला पुन्हा मशालीच्या प्रकाशात घ्या, असं म्हणत अनेकांना गेल्या काही दिवसात फोन केले, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.