ठाणे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिकाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११:०० वा. चरई येथील शिवसेना शाखेतून राजन विचारे यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी,युवासैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा राजन विचारे यांना संधी दिली आहे. गुरुपुष्यामृत दिवसाचा मुहूर्त साधत राजन विचारे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेली गद्दारी आणि त्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांना झालेला त्रास याची खंत विचारे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, राजन विचारे यांच्यासोबत अर्ज दाखल करताना लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, युवासेना कार्यकारणी सदस्य धनश्री विचारे, सुरेश मोहिते, संजय तरे, मंदार विचारे, महेंद्र पवार, राजेंद्र महाडिक, विश्वास निकम, दीपक साळवी, प्रदीप पुणेकर, प्रतिक राणे, जतीन पवार, सौरभ निकम, राज वर्मा, रेखा खोपकर, आकांक्षा राणे, वैशाली माने,प्रमिला भांगे, राजेश्री सुर्वे, अनिता हिलाल, महेश्वरी तरे, संगीता साळवी तसेच विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख,इतर शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुसंस्कृत ठाणेकर मतदार विरोधकांना योग्य धडा शिकवतील
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजन विचारे हे शक्तीस्थळावर गेले. तिथेही त्यांनी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथे जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी राजन विचारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, ठाण्याची जनता आता त्रस्त झाली आहे. पाणी असो की कचऱ्याचा प्रश्न ते सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.ठाण्यातील सुसंस्कृत मतदार योग्य धडा विरोधकांना शिकवतील असा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला.