कर्जतला जाण्यासाठी नवा रेल्वेमार्ग तयार होणार

0

कर्जत – कर्जत हे मुंबई आणि पुण्याला जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असल्याने मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) लोकलने थेट कर्जतला जाता येते, तर येत्या काही वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून पनवेलमार्गे कर्जतला जाणे शक्य होणार आहे. पनवेल – कर्जत या नव्या उपनगरीय दुहेरी मार्गामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी लोकलचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबईचे विस्तारीकरण होत असून महानगरातील प्रत्येक ठिकाण जलदगतीने जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार होत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या कामातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे बोगदा तयार करणे आहे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन ३,१४४ मीटर लांबीचे बोगदे तयार केले जात आहेत. यापैकी बोगदा क्रमांक २ वावर्ले हा २,६२५ मीटर लांबीचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे, तसेच या मार्गातील बोगदा क्रमांक १ नढालची लांबी २१९ मीटर आणि बोगदा क्रमांक ३ किरवलीची लांबी ३०० मीटर आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech