मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकाच्या यादीत उपरोक्त नेत्यांशिवाय अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भुपेंद्र पटेल, विष्णू देव साई, मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंह सैनी, हेमंत बिस्वा, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शिव प्रकाश, भुपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, नारायण राणे, पियुष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, स्मृती इराणी, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, अशोक नेते, संजय कुटे, नवनीत राणा यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने राज्यात उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर आरक्षित केली आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीवर परराज्यांतून हेलिकॉप्टर मागवण्याची वेळ आली आहे. दरम्यान मागणी वाढल्याने लोकसभेच्या तुलनेत हेलिकॉप्टर सेवेच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.