Author 1 महाराष्ट्र

महाराष्ट्र
जिल्हा दैनिके व साप्ताहिकांसाठी कठीण काळ, निमशहरी भागात पत्रकारिता करणार्‍यांपुढेही आव्हाने

जिल्हा दैनिके व साप्ताहिकांसाठी कठीण काळ, निमशहरी भागात पत्रकारिता करणार्‍यांपुढेही आव्हाने भिवंडी पत्रकार महासंघाच्या पत्रकार दिन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे आवाहन भिवंडी : जिल्हास्तरीय वर्तमानपत्रांना मिळणार्‍या जाहिरातींचे प्रमाण खूपच घटले आहे. कोरोनानंतर वाचकांची संख्याही कमी झाली आहे. त्यातच जीवघेण्या स्पर्धेमुळे जिल्हा वर्तमानपत्रे व साप्ताहिकांची स्थिती भयानक झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पत्रकार संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ एक दिवस पत्रकारांचा उदो उदो करण्यापेक्षा ३६५ दिवस पत्रकारक्षेत्रातील मंडळींना सन्मान कसा देता येईल याचा विचार केला गेला पाहिजे असे आवाहन ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी केले आहे. मराठी पत्रकारितेचे जनक `दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिनामित्त पत्रकार महासंघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख यांच्या पुढाकाराने भिवंडी तालुका पत्रकार महासंघ आणि अस्तित्व फाऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात भिवंडी तालुक्यातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांच्या सत्कार सन्मानाने तसेच पत्रकाराची आरोग्य तपासणी करून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या येऊ घातलेले नवनविन तंत्रज्ञान व सोशल मिडियामुळे वाचनाचे प्रमाण कमी झाले, परिणामी वाचकांची संख्या घटली आहे. जाहिरातींचे प्रमाणही कमी झाले आहे. मोठी वृत्तपत्रे वाचक मिळविण्यासाठी नाना तर्‍हेचे प्रयत्न करीत आहेत. तीन वर्षांची वर्गणी, पाच वर्षांची वर्गणी व त्या बदल्यात तेवढ्याच रक्कमेचे बक्षिस देवून वाचक वाढविण्याचा प्रयत्न भांडवलदारांची वर्तमानपत्रे करीत आहेत.  याचा सर्वाधिक फटका जिल्हा व तालुका स्तरावरील दैनिके व साप्ताहिकांना नजिकच्या काळात बसणार आहे. निमशहरी व ग्रामीण भागात निव्वळ पत्रकारिता करणाऱ्या   मंडळींनी आता जोडव्यवसायही उभारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत जिल्हास्तरीय वर्तमानपत्रांना मिळणार्‍या जाहिरातींचे प्रमाण खूपच घटले आहे. कोरोनानंतर वाचकांची संख्याही कमी झाली आहे. त्यातच जीवघेण्या स्पर्धेमुळे जिल्हा वर्तमानपत्रे व साप्ताहिकांची स्थिती भयानक झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पत्रकार संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ एक दिवस पत्रकारांचा उदो उदो करण्यापेक्षा ३६५ दिवस पत्रकारक्षेत्रातील मंडळींना सन्मान कसा देता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. अनेक पत्रकार संघ वर्षातून एक कार्यक्रम  म्हणून पत्रकार दिन साजरा करतात. एखाद्या मोठ्या वर्तमानपत्रात काम करणार्‍या संपादक वा पत्रकाराला बोलवितात, त्यांच्या समस्या, प्रश्न वेगळे असतात. मालकाकडून लाख दोन लाख वेतन घेणारी ही मंडळीं तालुकास्तरीय किंवा ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारितेचे महत्व सांगातात. परंतु प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. शहरी-ग्रामीण, अंशकालिन इत्यांदी पत्रकारांच्या समस्येला हात घातला जात नाही. पत्रकारांना शासनाकडून मिळणारे फायदे बहुतांश वेळी मुंबई, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरातील पत्रकारांना मिळतात. छोट्या शहरातील वा ग्रामीण भागात तो लाभ पत्रकारांना सहसा मिळत नाहीत. अनेक मंडळी पोलीस वा शासकीय अधिकारी, राजकीय नेते यांना पाहुणे म्हणून बोलवितात. ही सर्व मंडळी भ्रष्टाचारात यथेच्छ बुडलेली असतात आणि पत्रकारदिनी ते पत्रकारांना निस्पृह वा सच्ची पत्रकारिता करण्याचे आवाहन करतात. ही सर्व विसंगती पत्रकार संघटनांनी थांबविली पाहिजे. कुठला शासकीय अधिकारी वा नेता पत्रकार दिनी पत्रकारांना बोलवून त्यांचा सन्मान करतो का ? याचाही विचार झाला पाहिजे. अन्यथा बैल पोळ्या प्रमाणे `एक दिवस पत्रकारांचा’ असे होता का`मा नये. पत्रकारदिनी आपण बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेची उदाहरणे देतो, परंतु तो काळ वेगळा होता. देशपे्रमाने भारलेला होता. आज ही मंंडळी असती तर खरोखरच पत्रकारितेत टिकून राहिली असती का? पत्रकार संघटनांनी शासकीय योजनाचा लाभ सामान्य पत्रकारांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून पत्रकारितेतील विविध अनुभव तुषार राजे यांनी कथन केले. यावेळी भिवंडी तालुक्यातील विविध वृत्तपत्रात काम करणार्‍या सुमारे ३५ पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टराकडून  करून घेतली. गुणवंतांचा आणि पत्रकारांचा डायरी पेन, पुष्पगुच्छ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी सुदाम इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे. भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनेश्वर पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक धिंडे, ज्येष्ठ पत्रकार अमोल कदम, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार, फारूक मेमन, अस्तित्व फाऊंडेशनच्या अक्षया पाटील, पत्रकार महासंघाच्या अध्यक्षा कुसूमताई देशमुख आदी उपस्थित होते तर जेष्ठ पत्रकार तुषार राजे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला. भिवंडी तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख, किशोर पाटील, राजेश दळवी, दीपक हिरे, विनोद पाटील, राजेंद्र काबाडी, अफसर खान, विजय गायकवाड, कैलास ढमणे, रवि वर्मा, मनीलाल शिप्पी, संतोष चव्हाण, अमृत शर्मा, दीपक देशमुख यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Uncategorized
संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमारजी घोडीले पत्नीसह शिवसेनेत प्रवेश

मुंबई :- छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडीले यांनी आज…

महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

(अनंत नलावडे) मुंबई – राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे १ लाख घरे बांधण्यात येणार,अशी ग्वाही देत मुंबईच्या विकासासाठी लवकरच…

महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांची मानवंदना आणि अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नकोत देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांची मानवंदना आणि अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नकोत देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Uncategorized
मुख्यमंत्र्यांच्या कानउघडणी नंतरही ८ कॅबिनेट, तर ३ राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही..

(अनंत नलावडे ) मुंबई – राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडून १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना आणि…

महाराष्ट्र
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रोपवे द्वारे हवाई बस वाहतूक..परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अभिनव संकल्पना

मुंबई, २४ : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री म्हणून . प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय येथील दालनात पदभार स्वीकारला.   मुंबई ठाणे…

महाराष्ट्र
एकनाथ शिंदेंचा नवा पैलू  ‘द हार्ड बार्गेनर! ‘ अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या पण शिंदेकडे इनकमिंग सोर्स!

(किशोर आपटे ) भाजपकडून अजितदादां पेक्षा शिंदेंगटाला झुकते माप ? मुंबई –  राज्य मंत्रिमंडळाच्या  खातेवाटपाला  २१  डिसेंबरला अधिवेशन संपताच मुहूर्त…

राजकारण
‘ डेडीकेटेड टू कॉमन मॅन ‘ चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर – महाराष्ट्र राज्याचे गेली सव्वा दोन वर्ष कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा…

महाराष्ट्र
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य ; आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही

मुंबई, (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि…

राजकारण
वैदर्भिय हिवाळी अधिवेशनाचा सोपस्कार, आले देवाजीच्या मना. . . !

( किशोर आपटे.) महाराष्ट्रात अखेर विदर्भाचे सूपूत्र देवेंद्र फडणवीस तीस-यांदा मुख्यमंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात नागपूरात दिसणार आहेत. पण ज्या विदर्भाने…

1 2 3 16