आतापर्यंत 40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्कींगची प्रक्रिया पूर्ण

0

नवी दिल्ली : ग्राहकांचा सोन्याच्या बाजारपेठेतील विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. भारतीय मानक ब्युरोने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स अमेंडमेंट ऑर्डर, 2024 याअंतर्गत 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा सुरू केला.40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले आहे, ज्यामुळे याव्यतिरिक्त, चौथ्या टप्प्यात, अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत 18 अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चौथ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या जिल्ह्यांची एकूण संख्या आता 361 झाली आहे.

अनिवार्य हॉलमार्किंगची सुरुवात झाल्यापासून, नोंदणीकृत जवाहिऱ्यांची संख्या 34,647 वरून 1,94,039 पर्यंत वाढली आहे – त्यात पाचपटींहून अधिक इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, सोन्याची पारख करणे आणि हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांची (एएचसी) संख्या 945 वरून 1,622 पर्यंत वाढली आहे.भारत सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे दररोज 4 लाखांपेक्षा जास्त सोन्याच्या वस्तूंना विशिष्ट HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) क्रमांकासह हॉलमार्क केले जात आहे,ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. BIS केअर हे ॲप ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, BIS गुणवत्तेच्या चिन्हाचा गैरवापर आणि फसव्या जाहिरातींच्या तक्रारी दाखल करण्यास सक्षम बनवते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech