नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूनी मागितली जन्मठेपेला स्थगिती सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका . बलात्कार प्रकरणात ट्रायल कोर्टाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी आसाराम बापूने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गुजरात सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. खंडपीठाने म्हटले आहे की, हे प्रकरण ‘पोक्सो’चे आहे. केवळ वैद्यकीय परिस्थितीवर जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा विचार केला जाईल. वरिष्ठ अधिवक्ता दामा शेषाद्री नायडू आसाराम बापूच्या वतीने बाजूने कोर्टात उपस्थित झाले होते. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आसाराम बापूला गंभीर आजारांनी ग्रासले आहे.
तुरुंगातून अंतरिम सुटका करण्यास परवानगी देण्यासाठी कोणतेही अपवादात्मक कारण नाही, तर शिक्षेविरुद्ध त्यांचे अपील प्रलंबित आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी ऑगस्टमध्ये, गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता.