महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो सकारात्मक निर्णय होईल – एकनाथ शिंदे

0

सातारा : एकनाथ शिंदे यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार, या आणि अशा अनेक चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील दरे गावात शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मोदीजी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल, याबाबत मी स्पष्ट केले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्वात महत्त्वाचं मला काय मिळालं, दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले. निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्येत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असंही शिंदेंनी स्पष्ट केले. शिंदे म्हणाले, विरोधक काहीही बोलतात त्यांना काही काम राहिलेलं नाही. आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम नाही, अगदी विरोधी पक्षनेता देखील होता येत नाही. एवढं संख्याबळ आता त्यांचं कमी आहे. झारखंडमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लोकसभेमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. या भावांनी शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं, या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो. फेरमत मोजणीबाबत निवडणूक निवडणूक आयोग निर्णय घेईल. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता त्यावेळेस ईव्हीएम चांगला आहे, त्यांनी एकच भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech