राजकोट : अभिषेक शर्मा याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मेघालय संघाविरुद्ध वेगवान शतक पूर्ण केलं आहे. भारताचा टी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने इतिहासातील दुसऱ्या वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राजकोट येथे मेघालय विरुद्ध सययद मुश्ताफ अली ट्रॉफी सामन्यात हि कामगिरी त्यानं केली आहे. अभिषेकने २९ चेंडूत १०६ धावांची धडाकेबाज खेळी केली आहे. वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमाशी अभिषेक शर्माने आता बरोबरी केली आहे.
अलीकडेच त्रिपुराविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने २८ चेंडूत शतक झळकावून सर्व विक्रम मोडीत काढले. टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. मात्र आता भारताकडून टी-२० खेळणारा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माचे नावही त्याच्यासोबत जोडले गेले आहे.याशिवाय अभिषेक शर्मा देखील उर्विल पटेलसह संपूर्ण जगात टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा खेळाडू बनला आहे.
मेघालयने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्याने ७ विकेट्सवर १४२ धावा केल्या. मेघालयविरुद्ध डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माने गोलंदाजांचा नाश केला. एकूण २९ चेंडूंचा सामना करताना त्याने ३६५.५२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाबाद १०६ धावा केल्या. अभिषेकने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ११ षटकार मारले.अभिषेक शर्मा आणि रमणदीप सिंगने सर्वाधिक २-२ बळी घेतले. तर अश्विनी कुमार, हरप्रीत ब्रार आणि सोहराब धालीवाल यांनी १-१ विकेट घेतली. पंजाबने अवघ्या ९.३ षटकांत १४३ धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना ७ गडी राखून जिंकला.अभिषेक आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे.