मुंबई : भारतीय महसूल सेवेचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मैदानात उतरणार आहेत. समीर वानखेडे मुंबईमध्ये मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविआ सरकारच्या काळात समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडे सध्या चेन्नईमध्ये सरकारी नोकरी करत आहेत.
मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. धारावी विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे. वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात समीर वानखेडे यांना शिंदेसेना उतरवण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड संसदेत गेल्या आहेत. या मतदारसंघात आता ज्योती गायकवाड काँग्रेसकडून लढणार असल्याचे समजतेय. ज्योती गायकवाड यांच्याविरोधात समीर वानखेडे लढणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. महायुतीच्या जागावाटपात धारावीचा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे, त्याजागी समीर वानखेडे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.