राज ठाकरेंची निवडणुकीपूर्वी भविष्यवाणी
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असताना पुढचा मुख्यमंत्री कोण..? हा प्रश्न दररोज चर्चैला येतो. यावर सर्वजण आपापले अडाखे मांडत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी केलीय. एका मुलाखतीत आज, बुधवारी त्यांनी ही भविष्यवाणी केली.
मुलाखतीदरम्यान महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल..? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की , “मला वाटते, पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल. यावर पुन्हा विचारण्यात आले की, आपल्याला असे का वाटते..? यावर राज म्हणाले “वाटते तर वाटते.” राज ठाकरे पुढे म्हणाले, “जेव्हा 2029 मध्ये आपण मला हा प्रश्न विचाराल की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल..? तेव्हा मी सांगेन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा. यानंतर, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल..? या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. यावर, देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री होतील असे असे तुम्हाला वाटते ? असे विचारले असता, राज ठाकरे म्हणाले की, बिलकूल होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. दरम्यान मनसेला 2029 मध्ये सत्ता मिळेल या विधानाच्या अनुषंगाने उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, जर भाजप 1952 पासून ते 2014 पर्यंत थांबू शकते. शिवसेनाची स्थापना 1966 मध्ये झाली आणि 1995 मध्ये सत्तेत आली, तर माझ्याकडेही धैर्य आहे. पुढचा म्हणजे 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री बनेल असे त्यांनी स्पष्ट केले.