मुंबई – वांद्रे पश्चिम विधानसभा वार्ड क्रमांक 99 मध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात युतीचे सर्व स्थानिक
पदाधिकारी सहभागी झाले होते. वांद्रे पश्चिम विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात त्यांनी या मतदारसंघात केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघाचा चेहरा बदला असून आपण केलेल्या कामांच्या जोरावरच लोकांकडे मते मागत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.