पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

0

मुंबई – पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेले ३९ पोलीस अधिकारी व १७७ पोलीस अमलदारांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. यावेळी गणवेशधारी अधिकारी व जवानांनी सलामी दिली तसेच पोलिसांतर्फे अभिवादन रूपात बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. राज्यपालांनी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech