मुंबई : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला दुसरं समन्स पाठवलं आहे. ईडीने राज कुंद्राला 4 तारखेला पुन्हा तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगिलंय.
याआधीही राज कुंद्राला ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राज कुंद्रा या चौकशीसाठी हजर राहिला नाही. तसेच त्याने ईडीकडे वेळही मागितला होता. त्यानंतर ईडीने 4 तारखेला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अॅडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होता. आता तो या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.