शिवसेने तर्फे दिंडोशीवासियांना उद्यानाची भेट
आमदार सुनिल प्रभु यांच्या विकास निधीमधून उद्यानाचे सुशोभिकरण
मुंबई – दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४० मधील, नव्याने बांधण्यात आलेल्या “ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे स्मृती उद्यान” आज नागरिकांसाठी खुले झाले. पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांनी संघर्षं व अनेक आंदोलने करून येथे मध्यमवर्गीयांना निवारा मिळण्यासाठी सुमारे ६२ एकर जागेत नागरी निवारा वसाहत उभी केली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून या ठिकाणी सुसज्ज उद्यान त्यांच्या नावाने उभारावे अशी मागणी येथील ११३ गृहनिर्माण सोसायट्यांनी आमदार सुनील प्रभू यांच्या कडे केली होती. या उद्यानाचा विकास लवकरात लवकर करून नागरिकांना खुले करून देण्याची ग्वाही आमदार सुनील प्रभू यांनी स्थानिक नागरिकांना दिली होती. तसेच मागील अनेक महिने काम पूर्ण करून घेण्यासाठी माजी उप महापौर सुहास वाडकर यांनी देखील पाठपुरावा केला.
या ठिकाणी सुमारे ३००० चौरस मीटर जागेत तब्बल साडेतीन कोटी एवढा सौंदर्यीकरण निधी वापरून या उद्यानाचा विकास करण्यात आला. खडक फोडून आणि टेबल स्पॉट उभारून येथील निसर्गरम्य उद्यानात नागरिकांसाठी योगाची सुविधा, लहान मुलांसाठी विविध खेळणी, फिटनेस फ्रिक तरुणांसाठी ओपन एअर जिम, जेष्ठ नागरिकांसाठी गजेबो (जेष्ठ नागरिक कट्टा), बैठक व्यवस्था (गार्डन बेंच), हिरवळ (लॉन), विविध प्रकारची झाडे, चिमुरड्यासाठी विविध खेळणी, भव्य प्रवेशद्वार, जॉगिंग ट्रॅक, सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी खुले अँफी थिएटर, खुले समाज मंदिर अशा साधनांनी युक्त असे हे सुंदर रंगरंगोटी केलेले उद्यान येथील नागरिकांचे आधारवड ठरणार आहे.
शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते हे उद्यान आज रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी नागरिकांकरिता खुले करण्यात आले. यावेळी नागरी निवारा फेडरेशनचे पदाधिकारी मुकुंद सावंत, संग्राम राणे, शैलेश पेंडामकर, चंद्रकांत माने, व अन्य पदाधिकारी नागरी निवाराचे विश्वस्त विनायक जोशी, माजी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे उपविभागप्रमुख भाई परब, समन्वयक प्रशांत घोलप, विनिता विचारे विधानसभा समन्वयक आशा केणी, शाखाप्रमुख संदीप जाधव,शाखाप्रमुख संपत मोरे,पद्मा राऊळ,शिवसेना शाखा क्र. ४० च्या सर्व महिला, पुरुष उपशाखाप्रमुख, उपशाखासंघटक, गटप्रमुख, गटसंघटक, शिवसैनिक व येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.