मुंबई : हल्ली घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये नैवेद्य म्हणून पेढे मोदक ऐवजी वह्या पेन्सिलींची मदत करण्याची नवीन प्रथा सुरु करण्यात आली आहे. ही वह्या पुस्तके पेन्सिली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहेत असे आवाहन बोरीवली येथील शिवसेनेच्या महिला उपविभाग संघटक सौ. रेखा शांताराम बोऱ्हाडे यांनी केल्यानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन्सिलींची मदत रेखा शांताराम बोऱ्हाडे यांच्या कडे सुपूर्द केली. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक राजू देसाई, सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम, सौ. माया योगेश त्रिवेदी, संचित आणि अभिर बोऱ्हाडे हेही यावेळी उपस्थित होते. (छाया : शिवानी स्वप्नील धुळे)*