नाशिक – नाशिक शहरातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडे विधानसभेचे तिकीट देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामाचे नाशिक मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले की, नाशिक शहरातील एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे मी पंतप्रधान कार्यालयाचा प्रिन्सिपल सेक्रेटरी असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईल वरती फोन करून विधानसभेचे तिकीट पाहिजे असल्यास पन्नास लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून पैशाची मागणी केली होती याबाबत 06 ऑक्टोबर रोजी संबंधित लोकप्रतिनिधीने सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक एक च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व इतर माहितीच्या आधारे दिल्लीत हे आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करून आरोपी सर्वेश मिश्रा उर्फ शिवा राहणार गाजियाबाद उत्तर प्रदेश आणि गौरवनाथ राहणार दिल्ली असे हे दोन आरोपी असून त्या दोन्ही आरोपींना दिल्लीच्या स्पेशल विभागाने येथे झालेल्या एका प्रकरणांमध्ये अटक केली होती त्यानंतर त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना नाशिक येथे आणले असून त्यांना नाशिकच्या न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.
पोलीस आयुक्त मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे विशाल देवरे शरद सोनवणे जगेश्वर बोरसे यांनी या सदर प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळवले आहे.