बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपी उ.प्र.मधून ताब्यात

0

पुणे – पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपूर्वी एका २१ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामधील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक केली आहे. चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींपैकी दुसऱ्या 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तीन आरोपींपैकी आत्तापर्यंत २ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार असून पुणे पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीला ११ ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, डिंडोरी, मध्य प्रदेश) असं या आरोपीचं नाव आहे. यातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech