पुणे – मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी हवेतील वेगवेगळ्या कसरतींद्वारे दाखवलेल्या अचूकतेची आणि उत्कृष्टतेची एक झलक पाहून पुणेकर प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले. पुणेकरांना हा अनोख्या कसरतींचा एअर शो रविवारी अनुभवला. निमित्त होते दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणार-या ‘rozeo’ (रोझेओ) हवाई शोचे.
हडपसरमधील अॅमोनोरा माॅल येथे रविवारी सायंकाळी प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत रंगलेल्या या शोचे आयोजन स्टेफान जेरार्ड आणि अलयांस फ्राँसेज पुणेच्या संचालिका आमेली विजल यांनी केले होते. फ्रेंच संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या हवाई शो ने नुकतेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या सादरीकरणाने चार चांद लावले होते.
RoZéO(रोझेओ), हे स्तेफान जिरार्ड आणि कॅमिए बोमिए यांनी पॉलीन फ्रेमोच्या रचना आणि आन जोनाथनच्या कलाकृतींसह तयार केलेली एक अद्वितीय जिवंत प्रस्तुती आहे ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक प्रफुल्लित झाले. आकाशाच्या पटलावर हा शो जिवंत करण्यासाठी कलाकारांनी काव्यात्मक पद्धतीने आणि नाजूक हालचाली करीत कलाकुसरीने सादरीकरण केले. किमान ६ मीटर उंचीच्या धातूच्या खांबांवर हलक्या हाताने डोलणाऱ्या आकृत्या, कॅमर्ग्यूच्या रीडबेडवर जागृत केल्या. संगीताच्या लयबद्ध तालीवर इलेक्ट्राॅनिक्स आणि फिल्ड रेकाॅर्डिंग व साऊंडस्केपसह ४२ मिनिटांची ही सुंदर प्रस्तुतीने प्रेक्षकांमध्ये एक चिंतनशील वातावरणाची निर्मिती केली. कलाकारांच्या या प्रस्तुतीदरम्यान कला आणि निसर्ग एकमेकांशी समरूप झाल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. तसेच कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
जगभरात काही मोजक्याच शहरांत या शोचे आयोजन करण्यात आले. भारतातील पाच शहरांत हा शो आयोजित केला जात आहे. यात पुण्याचाही समावेश होता. ‘RoZeo’ आणि इतर रोमांचक विविध सांस्कृतिक प्रस्तुतींसह अलायन्स फ्रँन्सासेस नेटवर्क भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधील कलात्मक देवाणघेवाण आणखी मजबूत करीत आहे. ही नाविन्यपूर्ण निर्मिती आमच्या कलात्मक समुदायांना जोडणारे एक बंधन म्हणून काम करेल. अन् फ्रान्सच्या कलाकृतीचे दर्शन घडवेल. असे कार्यक्रमाच्या संयोजिका स्टेफान जेरार्ड आणि अलयांस फ्राँसेज पुणेच्या संचालिका आमेली विजल यांनी यावेळी सांगितले.
रोझियोचा 2023 मध्ये प्रीमियर झाला तसेच त्याच्या ऑलिम्पिक कामगिरीनंतर, कलात्मक दिग्दर्शक थॉमस जॉली यांनी तयार केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचा भाग म्हणून, त्यांच्या स्वप्नवत नृत्यदिग्दर्शनासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.