ठाणे – समाजात विक्रेत्यांचे कार्य हे अत्यंत महत्वाचे असुन त्यांची सुरक्षा व कल्याण हे महत्वाचे आहे, सकाळी साडे तीन वाजल्यापासुन धावणारा विक्रेता हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अन हेच जाणुन या विक्रेता समाजासाठी गेली सुमारे आठ वर्षापासुन महाराष्ट्र शासानाकडे कल्याणकारी मंडळाची मागणी करुन त्याचा सातत्याने पाठपुरावा केला गेला अन त्यात यश आले आहे या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन विक्रेत्याची सुरक्षा व त्याचे कल्याण यांचा विचार केला जाईल या सोबतच विक्रेत्यांच्या मुलाचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, आदी बाबींचाही विचार केला जाईल असे आमदार संजय केळकर यानी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघर्षे समितीच्या प्रतीनिधींशी बोलताना सांगितले. संघर्षे समितीने श्री संजय केळकर यांची विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दादर, सी.एस.टी., चर्चगेट,काळबादेवी, कांदीवली, ठाणे, गोरेगाव, लोखंडवाला, ओशिवरा, नवी मुंबई आदी विभागातुन विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यासोबतच ठाणे वृत्तपत्र विक्रेत्यानी आता विक्रेता न राहता वर्तमानपत्रांचे मालक होणे गरजेचे आहे यासाठी संघटनानी कंपन्याना बरोबर घेवुन प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या अर्थी कमिशन वाढ ही काळाची गरज असली तरीही तुमच्या लाईनबॉयचा पगार दुप्पट-तिप्पट झाला पण तुमचे कमिशन हे दुप्पट-तिप्पट होणे शक्य नाही यासाठी ह्या कमिशन खोरीच्या चक्रव्युहातुन अतीशय सावध गिरीने बाहेर पडणे गरजेचे आहे त्यासाठी नियोजन पुर्वक काम करावे लागेल. असे प्रतिपादन ठाणेवैभवचे मालक व संपादक श्री मिलिंद बल्लाळ यानी संघर्षे समितीशी बोलताना केले. वर्तमानपत्राच्या उद्योगात वर्तमानपत्र विक्रेता हा पायाभुत घटक असुन विक्रेता नसेल तर आम्हीही नाही त्यामुळे विक्रेत्यानी आजपर्यंत सहकार्य दिल्यामुळे मी विक्रेता प्रती कृतज्ञ आहे अशा शब्दात त्यानी कृतज्ञता व्यक्त केली. ठाणे वैभवचे 50 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संपुर्णॅ ठाणेवैभव परीवारास शुभेच्छा देण्यासाठी संघर्षे समितीने ठाणे वैभव कार्यालयास भेट दिली.