ठाणे : उपचाराअभावी मुरबाडमधील आंबेशिव गावात राहणाऱ्या एका वृद्ध विधवेची झालेली दुरवस्था बघून अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष चौमाल अस्वस्थ झाले. त्या व्यक्तीची दुरावस्था बघून दुःख झाले. या संदर्भात मी आमदार किसन कथोरे यांना फोन करून त्या वृद्ध आजारी महिलेला मदत करण्याची विनंती केली. कथोरे साहेबांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात आजाराने त्रस्त असलेल्या गरजू महिलेला उच्च वैद्यकीय सेवा उपलब्ध करून मदतीची व्यवस्था केली, याचा मला अभिमान आहे. आणि त्यांनी स्वतः मला या संपूर्ण प्रक्रियेची आणि तेथे केलेल्या जलद व्यवस्थेची माहिती दिली.
कोणत्याही आमदाराला अपेक्षित काम करता येत नसेल किंवा उशिराने केली तर त्याबद्दल आपण ओरड करतो. पण ते काम लगेच झाले तर त्याबद्दल आपण कमी बोलतो. मात्र, त्यांच्या चांगुलपणाचाही प्रचार व्हायला हवा. कथोरे साहेबांच्या या कार्याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे आणि समाधान आहे… आज आमदार किसन कथोरे साहेब प्रयत्नाने गरजूं रूग्णाला तात्काला सेवा उपलब्ध झाली उपचार सुरू झाले. कठीण प्रसंगात आमदार कथोरे धावून येतात त्यामुळे त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडणून येण्याची यावे अशी आशा बाळगूया… साहेब पुन्हा एकदा मुरबाड-बदलापूर विधानसभेवर निवडून यावे… धन्यवाद….