नवी मुंबई – 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत प्रत्येक मतदाराने भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी युगात सेल्फी छायाचित्रांचे आकर्षण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी आकर्षक सेल्फी पॉईंट उभारले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सेल्फी पॉईंटवर आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी सेल्फी छायाचित्र काढून आपण मतदान करणार आहोत असे अधोरेखित करीत 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.