गोंदिया – पाच वर्षाच्या पूर्वी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. आणी राष्ट्रवादीचा 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्रात परिवर्तन करीत 38 जागेवर महाआघाडीचे उमेदवार निवडून दिलं आहे. मोदींकडे बहुमत नसतानाही इतर लोकांच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे आज देशाची सत्ता मोदींकडे आहे. आता मात्र तास होता कामा नये परिवर्तन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता यायला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
तिरोडा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत (गुड्डू) ग्रुपचे यांच्या प्रकारासाठी शरद पवार यांची तिरोडा येथे जाहीर सभा झाली. मी कृषी मंत्री असताना सर्वात पहिले कर्जमाफीची घोषणा केली होती. आज शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे संकटात सापडलेले आहेत यांना संकटातून काढण्यासाठी आपल्याला परिवर्तन करण्याची गरज आहे. हे त्यासाठी भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, अशी हाक त्यांनी उपस्थित लोकांना दिली आहे. यावेळी मंचावर माझी गृहमंत्री अनिल देशमुख, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, अग्रवाल, अर्जुनी मोरगाव चे उमेदवार दिलीप बनसोड तिरोडा विधानसभा रविकांत बोपचे आणि स्टार प्रचारक कराडे सर उपस्थित होते.
महालक्ष्मी योजनेच्या माध्यमांतून महिलांना 3 हजार रुपये दिला जाईल तसेच महिला आणि सर्व मुलींना मोफत एस टी प्रवास दिला जाणार. शिक्षित बेरोजगार मुलांना नोकरी लागेपर्यंत महिन्यासाठी चार हजार रुपये मानधन दिले जाणार. 25 लाख रुपये सरसकट आरोग्य विमा दिला जाईल असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. महविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या…. पाच वर्षे सुसाशनच सरकार चालवून असा मी आपल्याला आश्वासन देतो, असे शरद पवार यांनी उपस्थितांना सांगितले.