ठाणे : ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी सुरू होत आहे. ५ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून सकाळी ११.३० वा. व संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मिनी येथे होणार आहे. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, मान्यवर कलाकार ह्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. वरदविनायक सेवा संस्था, ठाणे या संस्थेच्या “कडीपत्ता” या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ होईल.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस संघांचा सहभाग असणार आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्याचे संघही या स्पर्धेत सहभागी होऊन आपले प्रयोग सादर करतील. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी नाममात्र रु- १५/- व १०/- तिकीट ठेवण्यात आलेलं आहे.
राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना, हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे. ठाणे केंद्राचे स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड हे काम पाहत आहेत.
सादर होणारी नाटकं –
वरद विनायक सेवा संस्था – कडीपत्ता
ठाणे आर्ट गिल्ड – वेटलॉस
सुहासिनी नाट्यधारा – राजदंश
स्पंदन नाट्यकला – स्पायडरमॅन
सिमेन्स सांस्कृतिक संस्था – बायना का आयना
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ – टेक्नोपेटी
सतीश प्रधान ज्ञानसाधना नाट्य परिवार – अविघ्नेया
रंगसेवा सांस्कृतिक मंडळ – रंगसावली
रंगमित्र सांस्कृतिक कला मंडळ – यातायात
रामदास शेवाळे प्रतिष्ठान – बेबी
नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी – खुल्या आभाळात
नाटकी तारे फाउंडेशन – चोर नव्हता आमचा बाप
मुक्तछंद नाट्य संस्था – देवधर फॅमिली
महानायक फाउंडेशन – दुधावरची साय
लोकसेवा युवा संस्था – विदूषक
कला सरगम – दानव
कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था – सीतामरण
इंपल्स नाट्य संस्था – याच साठी केला होता अट्टाहास
दख्खनचा राजा प्रतिष्ठान – आम्ही बँडवाल
सी के टी महाविद्यालय – ओसपणाच्या कोस कोस
बौद्ध उपासक उपासिका समन्वय – ब्लॅक इज ब्युटीफूल
भारतवासी प्रबोधन संस्था – कृष्णविवर
अस्तित्व संस्था – काटा
मॅच्युअर थिएटर – सुखांची भांडतो आम्ही
संपर्क – ठाणे केंद्र समन्वयक – प्रफुल्ल गायकवाड
9004912468