पगार मिळतो लाखाचा खिसा मारतात वारकऱ्यांचा…!

0

आळंदी पंढरपुरची यात्रा म्हणजे ट्राफिक पोलिसांना वारकऱ्यांंना लुटण्याचे सुगिचे दिवस, राष्ट्रीयमहामार्ग पोलिस वाटमारीत व्यस्त…मुरबाड तालुक्यातच मुरबाड टोकावडे ट्राफिक अशा तिन्ही ठिकाणी बदल्या फिरवित अनेक पोलिस मुरबाड तालुक्यात गेले १२ ते १५ वर्ष बुड टेकून असल्याने लुटमारीत ते आघाडीवर असतात…

मुरबाड : गेल्या हप्ताभरापासून आळंदीची कार्तिकी वारी सुरू झाली आणी तपासणीच्या नावाखाली राष्टीय महामार्ग पोलिसांच्या धंदयाला बरकत आली आहे, वाटमारीत कमालीची वाढ झाल्याने आळंदीला जाणारे वयोवृद्ध महिला पुरूष भाविक वर्ग वर्गणी काढून टेम्पो ,ट्रक जिप,अशा वाहनातुन प्रवास करतांना कल्याण माळशेज हायवे व माळशेज घाटात हे वाटमारी तपासणीच्या नावाखाली लूटमार करीत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे…

भूवनगावातील अभय साबळे हे आपले वृद्ध आईवडीलासह आपलं कुंटूब एम एच -०५ डीच – ३८८३  ही आपली चारचाकी घेऊन जात असता घाटातील कैलास कोकाटे यांनी अडविली असता जागीच थांबला नाही तर पुढे जाऊन थांबला म्हणून त्यांचे कागद लायसन्स न तपासता त्यास १५०० रूपयांची फाईन मारली गेली… विशेष म्हणजे कैलास कोकाटे हे सहावर्ष टोकावडे पोलिस ठाण्यावर व आता उमरोली ट्राॅफिक विभागात पाच वर्ष म्हणजे एकाच तालुक्यात ११ वर्ष कसे ?

माळशेज हायवे वरील उमरोली नाक्या वरील टोळके सावर्णे, माळशेज घाटातील दोन ठिकाणीची दरोडेखोर ह्या सर्व ठिकाणी ५० ते १०० ऐवजी वाहन चालकाच्या बाजूच्या प्रवाशाने शिटबेल्ट लावला नसला तरी पैसे उपटले जातात व अनेक कारण सांगून किमान ५०० रू तरी उकळले जात असल्याने वाहन चालकात व या पोलिसात दिवसभर वाद होतच राहत असल्याचा आरोप रविंद्र चंदने जिल्हाध्यक्ष आरपिआय सेक्युलर यांनी केला आहे. सुरक्षीत प्रवासाबाबत जनजागृती करण्याचे सोडून केवळ वाटमारी करीत असल्याचा प्रकार थाबण्याचे नाव घेत नसल्याचा आरोप माजी प. स. सदस्य शाम राऊत यांनी केला आहे. तसही या रस्त्या वरील मामनोली, पोटगांव जंगलात, मुरबाड लगत ते घाटात जागो जागी झेंडूच्या फुलाच्या ट्रकच्या ट्रक भर झेंडूची फूल फेकून दिलेली रोजच्या रोज नागरिक पाहतात.  बाजारात झेंड्युच्या फुलांना १००रू किलो भाव असून मागणी देखील असतांना ट्रकभर फुल फेकून देण्यामागच कोड नागरिकांना कायम पडलं असलं तरी ह्या फुला आडून गांजाची व गोमाची तस्करी होत असल्याचे काही जाणकारांच मत असून या घटनेला दुजोर येथील बदली होऊन गेलेले पोलिस कर्मचारी देत असल्याचे समजले. माळशेज घाट हा वाळूचोरी रेतीच्या ट्रक, गोमास ,अशा तस्करीसाठी एक खुश्कीचा मार्ग बनला आहे.  या मार्गावर जागोजागी महसुल कार्यालये पोलिस तपासनी पथक ते राष्ट्रीय महामार्गाच्या घाटात जागो जागी असून हे सापडत नाहीत मात्र तपासणीच्या नावाखाली यांच्या वाटमारीत वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे ह्या तालुक्यात मुरबाड टोकावडे दोन पोलिस ठाणी असून उमरोली येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय आहे, येथील दारूभट्टयावरील भंगार व्यावसाईकांकडून व अवैधप्रवासी वाहना कडून हप्ते गोळा करणारे काही पोलिस मुरबाड हून बदली करून टोकावडेला जातात व तिथून बदली करून महामार्ग पोलिस ठाण्यात बस्तान मांडतात असे काही महाभाग ह्या तालुक्यात १२ ते १५ वर्ष ठाण मांडून असल्याने ते लुटमार करण्यात आघाडीवर असतात ईथे ठाणमांडून बसलेल्याचा जिल्हा बाहेर उचलबांगडी करण्याची मागणी रविंद्र चंदने जिल्हाध्यक्ष आरपीआय सेक्युलर यांनी केली आहे

अभय साबळे यांच्या एम एच -०५ डीच – ३८८३  ह्या चारचाकी वाहनावर माळशेज घाटातील ट्रॅफिक हवालदाराने 1500रूपयांची फाईन मारल्या बाबत उमरोली येथील ट्रॅफिकचे पिएसआय अनिल विसपुते यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ह्य वाहन चालकाने हेल्मेट घातले नव्हते व पट्टा लावला नसल्याने फाईन मारण्यात आली…

माळशेज घाटात पोलिसांनी थांवविण्यासाठी हात केला परंतु ब-याच गाड्या थाबल्या असल्याने मी थोडा पुढे जाऊन थांबलो संबधीत पोलिसाने माझे लायसन्स न पाहता किंवा शिटबेल्ट न पाहता मी थोड पुढ थांबल्याचा राग येऊन मला १५००रूपयांचा आॅनलाईन फाईन मारली.
-अभय साबळे,
वाहन चालक मालक

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech