बदलापूर – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली तसेच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात वारंवार बैठक घेऊन निष्काळजी केल्यामुळे मुंबई आणि ठाणे येथील शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले. ठाणे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, मुंबई शिक्षण अधिकारी राजेश कंकाल दोन वर्षापासून टेंडर झाले असे सांगण्यात येत होते. एखाद्या शाळेमध्ये कोणता प्रसंग झाला? यावर संचालक आणि मुख्याध्यापक यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर येणाऱ्या काळात त्यांना देखील सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
बदलापूरमधल्या नामांकित शाळेत 2 चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार 13 ऑगस्टला घडला. बदलापूर येथील नामांकित आदर्श शाळेत जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांनी थेट बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी सुमारे 9 तास लोकल सेवा रोखून धरली होती. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या विशेष तपास समितीने (SIT) बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात आता थेट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.