१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये बलात्कार

0

मुंबई – सोशल मीडियाचा कधी कोणता घटना घडेल यांचा अचूक अंदाज सायबर पोलिसांना येईलच असे निश्चित नाही. मात्र, सोशल मीडियाचा वाढता अतिरेक कधी घात करेल हे सुद्धा सांगणे अवघडच आहे, असाच काही प्रकार मुंबईच्या सांताक्रुझ येथील वाकोला भागात घडला आहे. सोशल मीडियांच्या माध्यमातून ओळख निर्माण करत २१ वर्षीय तरुणाने १३ वर्षीय मुलीला फूस लावून अपहरण करून गुजरातला घेवून जाऊन १५ ऑगस्ट रोजी या मुलीवर बलात्कार करण्याचा आल्याचा माहिती समोर आली आहे. तीन दिवसांनी मुलगी घरी परतली आणि तिने कुटुंबीयांना सर्व धक्कादायक सत्य सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्यावर बलात्कार आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोरेगावमधील हॉटेलमध्ये काम करत होता. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे आणि अनोळखी लोकांशी संवाद साधताना सतर्क राहणे आवश्यक आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech