आईचे अवयव खाणाऱ्या नरभक्षी लेकाला फाशी,मुंबई हायकोर्टाचा निर्णय

0

मुंबई – आपल्या ६३ वर्षांच्या आईची हत्या करून तिचे अवयव कापून खाल्ल्याचे हे प्रकरण महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील आहे. या प्रकरणात आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने नराधमास फाशीची शिक्षा ठोठावली होती. ही फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. फाशीची शिक्षा सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निरीक्षण न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.

स्वत:च्या जन्मदात्री आईची हत्या करून तिला कापून खाण्याइतका निर्घृण प्रकार याआधी पाहिला नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने या प्रकरणाबद्दल केली होती. हे प्रकरण २८ ऑगस्ट २०१७ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील माकवाला वसाहतीत घडले होते. ३५ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे मारले. हा मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने आपल्या आईचे तुकडे करण्यास सुरुवात केली. पुढे त्याने आपल्या आईचे अवयव बाहेर काढले. या आरोपी मुलाचे नाव आहे सुनील कुचकोरवी आपल्या ६३ वर्षांच्या आईची हत्या करून तिचे अवयव कापून खाले.

२८ ऑगस्ट २०१७ मध्ये सुनील कुचकोरवी याने आपल्या ६३ वर्षांची आई यल्लमा कुचकोरवी यांची निर्घृणपणे हत्या केली. एवढ्यावर हा आरोपी मुलगा थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अवयव काढून त्याला मीठ, मसाला, तेल लावून पॅनमध्ये तळले आणि खाल्ले. २०२१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने कुचकोरवीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो इतर कैद्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. जो व्यक्ती आईची हत्या करू शकतो त्याचा इतरांना धोका अधिक असून अशा व्यक्तीला सोडल्यास समाजात गुन्हा करण्याचे स्वातंत्र्य दिल्यासारखे असल्याचे न्यायालयाने नोंदविले. या सुनावणीला उच्च न्यायालयाने कुचकोरवीला पुण्यातील येरवडा कारागृहातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech