अजमेर – राजस्थानच्या अजमेर येथील गँगने सुमारे 32 वर्षांपूर्वी घडलेल्या ब्लॅकमेल आणि बलात्कार प्रकरणात 1992 साली शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या 250 मुलींची नग्न छायाचित्रे मिळवली होती. त्यानंतर सुमारे 100 हून अधिक विद्यार्थींनींना ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आले होते. ही टोळी विद्यार्थिनींना फार्म हाऊसवर बोलावून अत्याचार करायची. यामध्ये 11 ते 20 वयोगटातील विद्यार्थिनी होत्या. या प्रकरणात एकूण 18 आरोपी होते. त्यापैकी काही आरोपींना 1998 मध्ये शिक्षा झाली होती. तर उर्वरित 6 आरोपींना आज, मंगळवारी शिक्षा ठोठावण्यात आली.कोर्टाने नफीस चिश्ती, नसीम उर्फ टार्झन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सुमारे 32 वर्षांपूर्वी घडलेल्या ब्लॅकमेल आणि बलात्कार प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणी कैलाश सोनी, हरीश तोलानी, फारुख चिश्ती, इशरत अली, मोइजुल्ला उर्फ पुतन अलाहाबादी, परवेझ अन्सारी, नसीम उर्फ टारझन, पुरुषोत्तम उर्फ बबली, महेश लुधानी, अन्वर चिश्ती, शमसू उर्फ मॅराडोना आणि चिश्ती यांना अटक केली आहे 30 नोव्हेंबर 1992 रोजी अजमेर न्यायालयात पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले.पहिले आरोपपत्र 8 आरोपींविरुद्ध आणि त्यानंतर 4 स्वतंत्र आरोपपत्र 4 आरोपींविरुद्ध होते. यानंतरही पोलिसांनी अन्य 6 आरोपींविरुद्ध आणखी 4 आरोपपत्रे सादर केली. इथेच पोलिसांची सर्वात मोठी चूक झाली, त्यामुळे प्रकरण लांबत जाऊन 32 वर्षांनंतरही या प्रकरणात न्याय मिळालेला नाही.