मुंबई पोलिसांना लॉरेन्सचा ताबा मिळणार नाही

0

केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळून लावली मागणी

मुबंई : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातला कथित सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई याचा ताबा मिळावा, यासाठी मुंबई पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.मात्र, ही मागणी गृहमंत्रालयाने फेटाळून लावली आहे. लॉरेन्स बिश्नोईवर हत्या, खंडणी, ड्रग आणि शस्त्रास्त्र तस्करीप्रकरणी पंजाब, दिल्ली, गुजरात आणि मुंबईत त्याच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. खलिस्तान समर्थकांना आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी त्याच्यावर सध्या एनआयएअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी तो वर्षभरापासून साबरमती तुरुंगात असून, त्याच्यावर लावलेल्या कलमानुसार एक वर्षासाठी कोणत्याही राज्य वा तपास संस्थेला त्याचा ताबा देता येणार नाही. या कलमाची अंमलबजावणी ऑगस्टमध्ये संपल्यानंतर गृहमंत्रालयाकडून त्यात पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ घेण्यात आली होती. दरम्यान, मुबंई पोलिसांनी मात्र बिश्नोईचा ताबा मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech