बुलडाणा : मागच्या काही वर्षांपासून भारतातील ईव्हीएम यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाच्या निवडणूक आयोगाकडे कायम संशयाच्या नजरेने बघितले जात आहे. त्यातच माजी मंत्री सुबोध सावजी यांनीे केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा खून करु असे विधान बुलडाणा येथील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले होते. या प्रकरणी सुबोध सावजी यांच्याविरोधात बुलडाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, सुबोध सावजी यांनी महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली आहे. याचवेळी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करू असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत असून त्यंच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.